दिलीप कुमार रुग्णालयात

 Pali Hill
दिलीप कुमार रुग्णालयात

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेता ‘ट्रॅजिडी किंग’ दिलीप कुमार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दिलीप कुमार गेले काही दिवस सर्दी, खोकल्यानं त्रस्त आहेत. त्यातच त्यांच्या उजव्या पायाला सूज आली. हे लक्षात येताच त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी मंगळवारी तातडीनं दिलीप कुमार यांना लिलावती रुग्णालयात दाखल केलं. लाखो चित्रपटरसिकांचा हा लाडका अभिनेता येत्या 11 डिसेंबरला वयाच्या 94 व्या वर्षात पदार्पण करतोय. दिलीप कुमार हे त्यांच्यावर होणाऱ्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून वाढदिवसाच्या आधी ठणठणीत बरे होऊन घरी परततील असा विश्वास त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केलाय.

Loading Comments