दादासाहेब फाळके जन्मदिन विशेष, जाणून घ्या त्यांच्या संघर्षाची कहाणी


 • दादासाहेब फाळके जन्मदिन विशेष, जाणून घ्या त्यांच्या संघर्षाची कहाणी
 • दादासाहेब फाळके जन्मदिन विशेष, जाणून घ्या त्यांच्या संघर्षाची कहाणी
 • दादासाहेब फाळके जन्मदिन विशेष, जाणून घ्या त्यांच्या संघर्षाची कहाणी
SHARE

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब उर्फ धुंडीराज फाळके यांचा सोमवारी ३० एप्रिलला १४८ वा जन्मदिवस. ३ मे १९१३ मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित करून त्यांनी सिनेसृष्टीचा पाया भक्कम केला. पण पहिल्या चित्रपटाची निर्मिती करताना त्यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला.


अशी आहे त्यांच्या संघर्षाची कहाणी?

नाताळचा काळ सुरू असताना मुंबईच्या सँडहर्स्ट रोडवरील एका चित्रपटगृहात लाईफ ऑफ ख्राईस्ट नावाचा चित्रपट सुरू होता. त्यावेळी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची रांग लागली होती. त्यामध्ये दादासाहेब फाळके यांचाही समावेश होता. या चित्रपटातील अनेक प्रसंगादरम्यान ते विचलीत झाले. आणि त्यांनी या चित्रपटाची तुलना रामायण-महाभारताशी केली. त्यांनी हा चित्रपट चार ते पाच वेळा पहिला. त्याचीच प्रेरणा घेत मग त्यांनी आपणही चित्रपट क्षेत्रात प्रवेश करायचा असा निर्धार केला. आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी चित्रपटनिर्मितीचं कार्य सुरू केलं.

 अभ्यासाची गोडी आणि फक्त तीन तासांची झोप यामुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाला. तरीही त्यांनी चित्रपट निर्मितीचा हट्ट सोडला नाही. त्यांनी प्रथम लंडनला जाऊन चित्रपटनिर्मितीचं तंत्र समजावून घेतलं आणि तेथून आवश्यक ती यंत्रसामुग्री आणली. आणि यासाठी त्यांना आपली विमा पॉलिसीही गहाण ठेवावी लागली. मग त्यांनी राजा हरिश्चंद्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाचं एक नवा इतिहास घडवला. 

राजा हरिश्चंद्र या एका तासाच्या चित्रपट निर्मितीसाठी त्यांना जवळपास आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागला. या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची भूमिका दादासाहेबांनीच केली होती, तर तारामतीची भूमिका साळुंके नावाच्या पुरूष कलाकाराने आणि राजा हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका दादासाहेबांचा मुलगा भालचंद्र यांनी साकारली होती. अत्यंत कठोर परिश्रम करून तयार केलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनानंतर प्रचंड यश आणि पैसा मिळवला.


त्यांच्या विषयीच्या या गोष्टी

 • राजा हरिश्चंद्र चित्रपटानंतर दादासाहेबांनी आपला स्टुडिओ नाशिक येथे स्थलांतरीत केला. नाशिकमधील त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांनी मोहिनी भस्मासूर आणि सावित्री सत्यवान हे चित्रपट निर्माण केले.
 • १९१४ साली पहिले महायुद्ध सुरू असताना दादासाहेब इंग्लंडला गेले
 • १९३२ साली दादासाहेबांनी सेतुबंधन या मूकपटाचं डबिंग करून बोलपट बनवला.
 • १९१७ साली लंकादहन या चित्रपटाची निर्मिती केली
 • त्यांनी ऋळश्री रीशारवश (१९१७), श्रीकृष्ण जन्म (१९१८), कालियामर्दन (१९१९), भक्त प्रल्हाद (१९२६) या अविस्मरणीय चित्रपटांची निर्मिती केली.
 • दादासाहेबांनी १९३७ साली गंगावतरण हा चित्रपट दिग्दर्शित केला आणि त्यांचा हा चित्रपट शेवटचा चित्रपट ठरला.
 • त्यांचं निधन १६ फेब्रुवारी १९४४ रोजी नाशिक येथे झालं
 • भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्या योगदानाबद्दल चित्रपटसृष्टीत दिग्गज व्यक्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार १९६९ पासून दिला जातोया कलाकारांना मिळाला 'हा' पुरस्कार

दादासाहेब फाळके पुरस्काराच्या पहिल्या मानकरी देविका राणी ठरल्या. त्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी मिळवणारे पृथ्वीराज कपूर, रुबी मायर्स (सुलोचना), नितीन बोस, सोहराम मोदी, नौशाद, दुर्गा खोटे, सत्यजीत रे, व्ही. शांताराम, राज कपूर, ऋषिकेश मुखर्जी, भालजी पेंढारकर, भुपेन हजारिका, मजरुह सुलतानपूरी, गीतकार प्रदिप, डॉ. राजकुमार, दादामुनी अशोक कुमार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, दिलीप कुमार, बी. आर. चोप्रा, यश चोप्रा, देव आनंद, आशा भोसले, जयराज, ए. नागेश्वर राव, शाम बेनेगल, तपन सिंन्हा, मन्ना डे, व्ही. के. मुर्ती यांच्यासह अनेकांनी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या