हॅपी बर्थडे मिस्टर परफेक्शनिस्ट

Bandra, Mumbai  -  

वांद्रे - बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आज 52 वा बर्थडे आहे. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ आमिर खान बॉलिवुडवर राज्य करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमिरने आपला बर्थडे मीडियासोबत साजरा केला. कार्टर रोड येथील त्याच्या राहत्या घरी म्हणजे फरीदा वन या इमारतीच्या पार्किंगमध्ये केक कापून त्याने बर्थडे साजरा केला.

दंगल या आपल्या चित्रपटाच्या यशानंतर आमिर आपल्या येणाऱ्या आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तां'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आमिर मीडियाला भेटला तेव्हा तो एका नवीनच लुकमध्ये होता. नवीन सिनेमासाठी तो नेहमीच लुकमध्ये एक्सपिरिमेंट करत असतो. त्याच्या या नव्या लुकमध्ये तो जबराट दिसतोय. त्याच्या या नवीन लुकची सध्या सर्वीकडे चर्चा आहे. या वेळी आमिर खानने अनेक मुद्द्यांवर मीडियाशी गप्पा मारल्या.

Loading Comments