Advertisement

दिग्दर्शक महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा
SHARES

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' चित्रपटामुळं महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत. या चित्रपटात दाखवलेल्या चित्रीकरणामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतू आता या प्रकरणी मुंबई पोलिसांना पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांच्या तपासांत पोलीसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचं मांजरेकरांनी मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही दिली आहे.

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' चित्रपटामुळं महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत. त्यांच्या विरोधात मुंबईच्या माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर माहिम पोलीस स्थानकांत मांजरेकरांसह सिनेमाच्या निर्मात्यांवर 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबई पोलीसांनी कारवाई केली आहे. दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशावरून मांजरेकर यांच्यावर माहिम पोलिसांनी गुन्हा नोंदविला. मांजरेकर यांच्यावतीने ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी न्या. एस.एस. शिंदे व न्या. एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे युक्तिवाद केला होता. ट्रेलरमध्ये दाखवलेली दृश्ये चित्रपटाचा भाग नाहीत व युट्यूबवरून ट्रेलरही हटवली आहेत,’ असे गुप्ते यांनी सांगितले होते.

वृत्तसंस्था एएनआयनं यासंदर्भात ट्वीट करून ‘माहिम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवल्यानं प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात कलम २९२, ३४ तसेच पॉस्को कलम १४ आणि IT कलम ६७ व ६७ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी न्यायालयानं चौकशीचे आदेश दिले आहेत असं नमूद केलं आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा