मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेतून गायब असलेली कॅट म्हणजेच अभिनेत्री कतरिना हिच्यासाठी एक चांगली बातमी आहे. दिग्दर्शक कबीर खान यांच्या आगामी चित्रपटात अभिनेता म्हणून ऋतिकला साइन करण्यात आलंय. तर आता या सिमेमात आपल्याला अभिनेत्री कतरिनासोबत काम करायला आवडेल अशी इच्छा ऋतिकने व्यक्त केली आहे.
यापूर्वी दिग्दर्शक कबीर खान यांनी या सिनेमात अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोण आणि कृती सानोन यांच्या नावाबद्दल विचार केला होता. पण ऋतिकने कतरिनाचं नाव पुढे केल्यानंतर कबीर खानही कॅटला मुख्य भूमिकेत घेण्याच्या विचारात आहेत.