Advertisement

दीया मिर्झानं शेअर केले लग्नसोहळ्याचे खास फोटो

दीयानं लग्नाचे काही फोटो सोशल मीडिया अकाउटंवर शेअर केले आहेत.

SHARES
01/9
दीया मिर्झानं शेअर केले लग्नसोहळ्याचे खास फोटो
बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा १५ फेब्रुवारी रोजी बिझनेसमन वैभव रेखीसोबत विवाहबद्ध झाली. दीयाच्या मुंबईतील राहत्या घरी हा लग्नसोहळा संपन्न झाला. लग्नाला दीया आणि वैभवच्या कुटुंबीयांसह मोजके मित्र उपस्थित होते. लग्नानंतर दीयानं लग्नाचे काही फोटो सोशल मीडिया अकाउटंवर शेअर केले आहेत.
02/9
दीया मिर्झानं शेअर केले लग्नसोहळ्याचे खास फोटो
हिंदू पद्धतीनं वैभव आणि दीयाचे लग्न झाले. लग्नात दीयानं लाल रंगाची भरजरी साडी नेसली होती. नववधूच्या रुपात दीयाचे सौंदर्य आणखीनच खुलून आले होते. तर वैभवनं पांढ-या रंगाच्या कुर्ता पायजामासह नेहरु जॅकेट घातले होते.
03/9
दीया मिर्झानं शेअर केले लग्नसोहळ्याचे खास फोटो
विशेष म्हणजे दीया आणि वैभव या दोघांचंही हे दुसरे लग्न आहे. योगा आणि लाइफस्टाइल कोच सुनैना रेखीसोबत वैभवचे पहिले लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या काही वर्षांतच दोघे विभक्त झाले.
04/9
दीया मिर्झानं शेअर केले लग्नसोहळ्याचे खास फोटो
वैभव हा एक प्रसिद्ध व्यावसायिक असून मुंबईतील पाली हिल परिसरात राहतो. पहिल्या लग्नापासून वैभवला एक मुलगी आहे.
05/9
दीया मिर्झानं शेअर केले लग्नसोहळ्याचे खास फोटो
लॉकडाऊनच्या काळात दीया आणि वैभव जवळ आले आणि आता त्यांनी आपल्या मैत्रीचे रुपांतर लग्नात केले आहे.
06/9
दीया मिर्झानं शेअर केले लग्नसोहळ्याचे खास फोटो
दीयाचे पहिले लग्न बिझनेसमन साहिल संघासोबत झाले होते. ऑक्टोबर २०१४ मध्ये दोघांनी दिल्लीत आर्य-समाजात अगदी साधा पद्धतीनं लग्न केले होते.
07/9
दीया मिर्झानं शेअर केले लग्नसोहळ्याचे खास फोटो
दीया आणि साहिल लग्नापूर्वी ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले होते. मात्र २०१९ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता.
08/9
दीया मिर्झानं शेअर केले लग्नसोहळ्याचे खास फोटो
09/9
दीया मिर्झानं शेअर केले लग्नसोहळ्याचे खास फोटो
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा