Advertisement

मनसेच्या दणक्यानंतर आदित्य नारायणनं मागितली अलिबागकरांची माफी

सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडल-१२’ हा शो गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे.

मनसेच्या दणक्यानंतर आदित्य नारायणनं मागितली अलिबागकरांची माफी
SHARES

सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडल-१२’ हा शो गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. शोच्या सुत्रसंचालनावेळी आदित्यनं अलिबागबद्दल केलेल्या वक्तव्यानं त्यावर जोरदार टीका केली गेली. त्यानंतर आता आदित्य नारायणनं सोशल मीडियावरून माफी मागितली आहे. यासंदर्भात आदित्य नाराय़णनं फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

यात तो म्हणाला, मला हात जोडून नम्रपणे अलिबागमधील लोकांची आणि माझ्या इंडियन आयडलमधील वक्तव्यामुळे दुखावलेल्या सर्वांची माफी मागायची आहे. माझा कुणालाही दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता. अलिबागबद्दल मला प्रचंड प्रेम आणि आदर आहे. माझ्या स्वत:च्या त्या जागेशी, लोकांशी आणि मातीशी भावना जोडल्या गेल्या आहेत.

‘इंडियन आयडल १२’ या शो दरम्यान एका स्पर्धकाला गाणे संपल्यानंतर आदित्यनं अलिबागवरून टोला लगावला होता. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आदित्य नारायणच्या या वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला होता.

अमेय खोपकर यांनी फेसबुक व्हिडीओद्वारे या प्रकरणावर संताप व्यक्त केला, असून यापुढे अलिबागबद्दल असे काहीही वक्तव्य करशील, तर तुझ्या कानाखाली आवाज काढेन, असा इशारा दिला होता.



हेही वाचा

दीपिका पादुकोण आणि संजय भन्साळी पुन्हा एकदा एकत्र

कोरोनातून बरी होऊन बंगळुरुहून मुंबईला परतली दीपिका

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा