मनपाने 5 लाखांची लाच मागितली - कपिल

 Goregaon
मनपाने 5 लाखांची लाच मागितली - कपिल
मनपाने 5 लाखांची लाच मागितली - कपिल
मनपाने 5 लाखांची लाच मागितली - कपिल
See all

मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्यांनी 5 लाखांची लाच मागितली, असा आरोप कॉमेडी किंग कपिल शर्माने केला आहे. ट्विटरवर कपिलने मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर सडकून टीका केली आहे. कपिल शर्माने ट्विटवर याबाबत माहिती दिली आहे. “मागील पाच वर्षांपासून 15 कोटींचा आयकर भरत आहे. तरीही कार्यालय बनवण्यासाठी माझ्याकडून मुंबई महापालिकेने 5 लाखांची लाच मागितली,” असा संताप कपिलने व्यक्त केलाय.तसंच दुसऱ्या एका ट्विटमध्ये ‘हेच अच्छे दिन आहेत का?’, असा सवाल करत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही प्रश्न केलाय. दरम्यान, कपिल शर्माच्या या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ज्या अधिकाऱ्याने लाच मागितली त्याचं नाव कपिल शर्माने सांगावं, या प्रकरणाचा तपास करुन त्यावर कारवाई करु, असं आश्वासन पालिकेने दिलं आहे.

Loading Comments