'जय मल्हार' मालिका होणार बंद?

 Mumbai
'जय मल्हार' मालिका होणार बंद?
Mumbai  -  

मुंबई - घड्याळात संध्याकाळचे ७ वाजले की सगळ्यांच्या घरातून 'अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी' हे सूर घुमू लागतात. पण आता काही दिवसात हे सूर ऐकायला मिळणार नाहीयेत. प्रेक्षकांची पसंती मिळवलेली मालिका 'जय मल्हार' लवकरच बंद होणार असल्याचं समजतंय.

18 मे 2014 रोजी या मालिकेची सुरुवात झाली. खूप कमी वेळातच मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. मालिकेतील मल्हार, बानू, म्हाळसा प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले. आतापर्यंत या मालिकेचे 900 एपिसोड पूर्ण झाले आहेत. या मालिकेचा 942 हा शेवटचा भाग असेल. या मालिकेने टीआरपीचे रेकॉर्डस् मोडले आहेत. या मालिकेतून समोर आलेले देवदत्त नागे, इशा कासकर, सुरभी हांडे यांना प्रेक्षकांच भरभरून प्रेम मिळालं.

गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवर एका नवीन मालिकेचे प्रोमो सुरू झाले आहेत. तीच मालिका 'जय मल्हार' या मालिकेच्या जागी प्रसारित होणार आहे. तसेच 15 एप्रिल हा चित्रीकरणाचा शेवटचा दिवस असल्याचं देखील समजते.

Loading Comments