SHARE

वांद्रे - अवघ्या मराठीत काय तर हिंदी सिनेसृष्टीलाही झिंगाट करायला लावणारा सिनेमा अर्थात 'सैराट' अजूनही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. सैराट रिलीज झाल्यानंतर हा सिनेमा तमिळमध्येही रिलीज होणार, अशी चर्चा रंगू लागली आणि त्यामध्ये ही आर्चीच म्हणजे रिंकू राजगुरूच दिसणार हेही स्पष्ट करण्यात आलं. पण आता अजून एक बातमी पसरलीये, सैराट हिंदीतही बनवला जाणार आहे आणि तो बनवणार आहे करण जोहर. मग हिंदीत आर्चीची भूमिका कोण करणार याची उत्सुकता होती. ही भूमिका श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर करण्याची शक्यता आहे. आता हे किती खरं आणि किती खोटं हे काळच ठरवेल. श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनीच जान्हवी करण जोहरच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल, असं जाहीर केलंय. पण तो सिनेमा कोणता हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या