जॉन सुद्धा करतोय मराठी सिनेमा...

 Mumbai
जॉन सुद्धा करतोय मराठी सिनेमा...
Mumbai  -  

मराठी सिनेमा आपला झेंडा अटकेपार रोवत आहे. बॉलीवूड मधले तर कित्येक कलाकार आता मराठी सिनेमांकडे वळताना दिसत आहेत. त्यात सलमान खान , रितेश देशमुख , प्रियांका चोप्रा अशी बरीच मोठं मोठी नावं आतापर्यंत सामील झाली आहेत. आता या यादीत अजून एक बॉलीवूड स्टारचं नाव सामील होणार आहे. जॉन अब्राहमही लवकरच मराठी सिनेमा प्रोड्यूस करणार आहे.

काही महिन्यांपूर्वी त्याने ही इच्छा बोलून दाखवली होती. मराठी सिनेमा खूप चांगला आहे. मला मराठी सिनेमात काम करायला नक्कीच आवडेल. मी लवकरच मराठी सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकेन, असं म्हणाला होता.

नुकतंच त्याचे 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ' सभासद कार्ड व्हायरल होताना पाहायला मिळतंय. त्यात जॉन अब्राहम मराठी सिनेमाचा निर्माता म्हणून समोर येणार आहे. त्या तो सिनेमा कोणता याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

Loading Comments