मुरंजन - एकांकिका स्पर्धेत जोशी-बेडेकर अव्वल

  Pali Hill
  मुरंजन - एकांकिका स्पर्धेत जोशी-बेडेकर अव्वल
  मुंबई  -  

  चर्चगेट - येथील सिडनॅहम महाविद्यालयाच्या 'मुरंजन'ची शुक्रवार, 6 जानेवारीच्या रात्री सांगता झाली. 'मुंबई लाइव्ह' या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक होते. एकांकिका स्पर्धेत जोशी बेडेकर महाविद्यालयानं पहिला, कीर्ती महाविद्यालयानं दुसरा तर वर्तक महाविद्यालयानं तिसरा क्रमांक पटकावला.

  या वेळी सादर झालेल्या एकांकिकांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. अंतिम फेरीमध्ये सादर झालेल्या पाचही एकांकिकांमध्ये चांगलीच चुरस दिसली. जोशी बेडेकर महाविद्यालयाची असन-नसन, कीर्ती महाविद्यालयाची एड्ज, वर्तक महाविद्यालयाची मजार, साठ्ये महाविद्यालयाची बुंदे, सोमय्या कॉलेजची पाळणा अशा या पाच एकांकिका होत्या. परीक्षक म्हणून ऋजुता देशमुख आणि मधुरा वेलणकर-साटम यांनी काम पाहिलं. या दरम्यान प्रहसन, पथनाट्य, फोटोग्राफी, शॉर्टफिल्म, गायन अशा विविध स्पर्धांतल्या विजेत्यांना पारितोषिकंही देण्यात आली. या कार्यक्रमाला सुशांत शेलार प्रमुख पाहुणे होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.