जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टसाठी मोजावे लागणार 76 हजार

 Mumbai
जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टसाठी मोजावे लागणार 76 हजार
Mumbai  -  

मुंबई - कॅनेडियन गायक जस्टिन बिबर 10 मे रोजी मुंबईमध्ये गाणार आहे. पण त्याच्या कॉन्सर्टसाठी तुम्हाला 76 हजार रुपये मोजावे लागतील. विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. कॉन्सर्टचं सुरुवातीचं तिकीट 4 हजार आणि सर्वात महाग तिकीट 76 हजार रूपयांचं आहे. कॉन्सर्टची तिकीटं बुक माय शो वर दुपारनंतर उपलब्ध आहेत. 10 मे ला डि. वाय. पाटील स्टेडियममध्ये ही कॉन्सर्ट होणार आहे.

जस्टिन बिबरचे भारतात असणारे वेड पाहता सध्या त्याच्या चाहत्यांमध्येही कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. अनेकांनी जस्टिनच्या कॉन्सर्टला हजेरी लावण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. या कॉन्सर्टला बॉलिवूड आणि खेळ जगतातील दिग्गज हजेरी लावणार आहेत. तिकीटांची विक्री ऑनलाइन होणार आहे आणि त्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यामुळे तिकिटांची विक्री काही तासांमध्येच होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी कोल्ड प्ले कॉन्सर्ट मुंबईत झाली होती. पण कॉल्ड प्ले तिकिटांची किंमत 25 हजार इतकी होती. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या कॉन्सर्ट्सपैकी ही सर्वात खर्चिक अशी कॉन्सर्ट आहे.

Loading Comments