गौरी आणि शिवने घातली फुगडी

 Girgaon
गौरी आणि शिवने घातली फुगडी

गिरगाव - हिंदू धर्मातील नवीन वर्ष म्हणजे अर्थात 'गुढीपाडवा'. आणि गुढीपाडव्याला नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळीकडेच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत. मुंबईतील गिरगावचा गुढीपाडवा हा खास आकर्षणाचा विषय असतो. अवघी तरुणाई इथे नटून थटून आलेली पाहायला मिळते.पण, या यावर्षीचं खास आकर्षण ठरलं ते झी मराठीच्या कलाकारांचं. गौरी, शीव म्हणजेच सायली संजीव आणि ऋषी सक्सेना आणि प्राजक्ता माळी यांनी गिरगावच्या शोभायात्रेत खास हजेरी लावली. तसंच सायली संजीव आणि ऋषीने चक्क फुगडीही घातली. त्याचा व्हीडिओ सायलीने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय. आणि तिच्या या व्हीडिओला सोशल मीडियावर नेटीझन्सची चांगलीच पसंतीही मिळतीये.

Loading Comments