'या' फोटोमुळे काजोल सोशल मीडियावर ट्रोल !


SHARE

'23वें कोलकाता इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल'  नुकतीच सुरवात झाली आहे. या ठिकाणी बॉलिवूड चे बरेच कलाकार उपस्थित होते. अमिताभ बच्चन बरोबरच शाहरुख खान , कमल हसन , महेश भट्ट आणि काजोल ही उपस्थित होते. यावेळी काजोल ने तिच्या ट्विटर अकाउंट वरून एक फोटो शेअर केला ज्यात तिच्याबरोबर अमिताभ बच्चन आणि कमल हसन आहेत.हा फोटो शेअर केल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर काजोलला ट्रोल करायला सुरवात झाली. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या फोटो मध्ये असं काय होत ज्यामुळे तिला ट्रोल केलं गेलं ?

तर हा तो फोटो पहा.

खरंतर या फोटोमध्ये तिला ट्रोल करण्यासारखं काही नाहीये तिला ट्रोल केलयं ते तिने लिहिलेल्या फोटो कॅप्शनमुळे.

काजोल ने फोटो ट्विटर वर टाकला आणि त्याला ' दोन लेजंड्स बरोबर सेल्फी टाइम.... स्वतःला आवरू नाही शकले ' असं कॅप्शन त्याला दिल. या फोटो ला सेल्फी म्हणत काजोल ने तो शेअर केला खरा पण सेल्फी नसलेल्या या फोटो कॅप्शनमुळे तीला ट्रोल करायला सुरवात झाली.

या फोटो शेअर केल्यानंतर लोकांनी तिला विचारायला सुरवात केली की , तुझे दोन्ही हात पाठी आहेत मग सेल्फी पाठून काढला का ? "लोकांनी हे पण विचारलं की , ' हा सेल्फी आहे का मॅम ? "

पण यावर काजोल ने काहीही प्रतिक्रिया दिली नाही.


संबंधित विषय