Advertisement

'खुलता कळी खुलेना'तली अभिज्ञा आता 'कट्टी बट्टी'त दिसणार!


'खुलता कळी खुलेना'तली अभिज्ञा आता 'कट्टी बट्टी'त दिसणार!
SHARES

'खुलता कळी खुलेना' ही मालिका संपली असली, तरी त्यातली मोनिका ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेत मोनिका ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. या मालिकेत तिची भूमिका निगेटिव्ह असली, तरी अभिज्ञा सगळ्यांची आवडती होती. 'खुलता कळी खुलेना' ही मालिका संपल्यानंतर अभिज्ञा काही काळ छोट्या पडद्यापासून लांब होती. लवकरच अभिज्ञा 'कट्टी बट्टी' या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे.अश्विनी मुख्य भूमिकेत

'कट्टी बट्टी' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अश्विनी कासार मुख्य भूमिकेत आहे. याआधी अश्विनी 'कमला' या मालिकेत दिसली होती. अश्विनीने साकारलेली कमला या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजावलं होतं. 'कट्टी बट्टी' या मालिकेचे शुटिंग अहमदनगरमध्ये सुरू असून या मालिकेचे कथानक मराठवाड्याशी संबंधित आहे. मात्र, अभिज्ञाची या मालिकेतील भूमिका तिच्या आतापर्यंतच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे.


अभिज्ञाची हिंदी मालिकांमध्ये छाप

मराठीशिवाय अभिज्ञाने हिंदी मालिकांमध्येही अभिनयाची छाप सोडली होती. लव्ह यू जिंदगी, प्यार की एक कहानी, धर्मकन्या, बडे अच्छे लगते है या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या होत्या. तर लंगर हा मराठी चित्रपट आणि लग्नलॉजी या नाटकातून अभिज्ञाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. तर लगोरी, अस्मिता, एक मोहोर अबोल अशा मराठी मालिकांमध्येही तिने छोट्या भूमिका साकारल्या.हेही वाचा

वैभव-अंकिताची मैत्री कशी झाली? वाचा


संबंधित विषय
Advertisement