Advertisement

मिम्स शेअर करत कंगनाकडून मुख्यमंत्र्यांना रावणाची उपमा

चित्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रावणाची उपमा दिली आहे. त्यात त्यांना दहा तोंडं दाखवली असून मागे जेसीबी दाखवला आहे.

मिम्स शेअर करत कंगनाकडून मुख्यमंत्र्यांना रावणाची उपमा
SHARES

मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह मिम्स शेअर करत कंगना रनौतनं पुन्हा एकदा ट्वीट केलं आहे. कंगनानं एक चित्र शेअर केलंय. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई दिसत आहेत. यात राणी लक्ष्मीबाईंच्या रुपात कंगना दिसत आहे. तर या चित्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रावणाची उपमा दिली आहे. त्यात त्यांना दहा तोंडं दाखवली असून मागे जेसीबी दाखवला आहे.


चित्रासोबतच कंगनानं मराठीत ट्वीट देखील केलं आहे. यात ती म्हणते, 'लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्यानं पुढे जात राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र'.

पालिकेकडून कंगनाच्या कार्यालयाचं अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं होतं. त्यानंतर कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला होता. तिनं काही वेळा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी करत देखील टीका केली आहे. ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा पाया रचला, तिच विचारधारा विकून शिवसेना सत्तेसाठी सोनिया सेना बनली आहे. ज्या गुंडांनी माझ्या नकळत माझं घर तोडलं, त्यांना स्थानिक प्रशासकीय संस्था म्हणू नका. संविधानाचा इतका अपमान करू नका,” असं कंगनानं म्हटलं होतं

आणखी एक ट्विट करत तिनं म्हटलं होत की, वडिलांच्या चांगल्या कर्मामुळं तुम्हाला धनदौलत तर मिळू शकते मात्र आदर तुम्हाला स्वत: कमवावा लागतो. माझं तोंड बंद कराल मात्र माझ्यानंतर शंभर जण तो आवाज लाखों लोकांपर्यंत पोहोचवतील. किती तोंडं तुम्ही बंद करणार? कुठवर सत्यापासून दूर पळणार. तुम्ही फक्त वंशवादाचं एक उदाहरण आहात, बाकी काही नाही.



हेही वाचा

कंगना रणौतवर पाेलिसांत आणखी एक तक्रार दाखल

National School Of Drama च्या संचालकपदी परेश रावल यांची नियुक्ती

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा