Advertisement

National school of drama च्या संचालकपदी परेश रावल यांची नियुक्ती

भाजपचे माजी खासदार परेश रावल आता एनएसडीची (NSD) धुरा सांभळतील.

National school of drama च्या संचालकपदी परेश रावल यांची नियुक्ती
SHARES

प्रसिद्ध अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल (Paresh rawal) यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (National school of drama) च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे माजी खासदार परेश रावल आता एनएसडीची (NSD) धुरा सांभळतील. राजस्थानचे प्रसिद्ध कवी अर्जुन देव चरण यांची जागा ते घेणार आहेत.

२०१८ साली त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक म्हणून अर्जुन देव चरण यांना नियुक्त करण्यात आलं होतं. आता परेश रावल हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे नवे संचालक आहेत. NSD च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही माहिती देण्यात आली आहे.

एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेल्या अभिनेते परेश रावल यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, हे काम आव्हानात्मक पण मजेदार असेल. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनीही परेश रावल यांना देण्यात आलेल्या नव्या जबाबदाऱ्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : कंगनाच्या ४८ कोटीच्या मालमत्तेवर पालिकेचा हातोडा, पाहा आलिशान ऑफिसचे फोटो

परेश रावल यांना तीस वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. १९९४ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. त्याशिवाय बॉलिवूड इंडस्ट्रीत दिलेल्या योगदानाबद्दल २०१४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

परेश रावल यांनी १९८४ मध्ये आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी होली नावाच्या चित्रपटात सहायक भूमिका साकारल्या. त्यानंतर १९८६ मध्ये त्यांनी नाम नावाच्या चित्रपटात देखील भूमिका केली.

परेश रावल हे १९८० ते १९९० दरम्यान अनेक चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसले. त्याचवेळी, रावल यांनी हेराफेरी या विनोदी चित्रपटातील बाबुरावच्या व्यक्तिरेखेनं देखील लोकप्रियता मिळवली.



हेही वाचा

कंगना रणौतवर पाेलिसांत आणखी एक तक्रार दाखल

संजय दत्तनं 'शमशेरा' चित्रपटाचं चित्रिकरण केलं पूर्ण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा