Advertisement

कंगना रणौतवर पाेलिसांत आणखी एक तक्रार दाखल

मुंबई महापालिकेच्या कारवाईनंतर संतापून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारी अभिनेत्री कंगना रणौत हिच्यावर विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार नाेंदवण्यात आली आहे.

कंगना रणौतवर पाेलिसांत आणखी एक तक्रार दाखल
SHARES

मुंबई महापालिकेच्या कारवाईनंतर संतापून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारी अभिनेत्री कंगना रणौत हिच्यावर विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार नाेंदवण्यात आली आहे. कलम ४९९ अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असं माने यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. मागील काही दिवसांमध्ये कंगनाविरोधात नोंदवण्यात आलेली हा तिसरी तक्रार आहे. (police complaint register in vikhroli against actress kangana ranaut)

वकील नितीन माने यांनी ही तक्रार नोंदवली असून माने कंगनाविरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

याआधी अभिनेत्री कंगना रणौतविरोधात मुंबईच्या खार आणि आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. खार इथं संतोष देशपांडे आणि आझाद मैदानात काँग्रेसचे कार्यकर्ते निजामुद्दीन रायन यांनी तक्रारी दाखल केली आहे. पोलिसांविरोधात वादग्रस्त ट्विट केल्यानं तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुंडआणि माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मुंबई पोलिसांची सुरक्षा नको, असं म्हणत कंगनाने मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवला होता.

हेही वाचा-  कंगना रणौतविरोधात मुंबईत तक्रार दाखल

तर, कंगनाने मुंबईत पाऊल ठेवल्या ठेवल्याच व्हिडिओ जारी करत मुख्यमंत्र्यांवर आगपाखड केली होती. उद्धव ठाकरे तुला काय वाटतं की तू फिल्म माफियाशी हातमिळवणी करून माझं घर तोडत बदला घेतला? आज माझं घर तोडलं, उद्या तुझा अहंकार मोडेल. हे वेळेचं चक्र आहे, लक्षात ठेव. अशा एकेरी शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला होता.

यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना विचारलं असता, राऊत यांनी केवळ ११ कोटी मराठी जनतेने ऐकलं आहे, अशी मोजकी प्रतिक्रिया दिली. 

कंगनाच्या वादावर विनाकारण बोलून उगाच तिचं महत्त्व वाढवू नका, असे आदेश पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना मातोश्रीवरून देण्यात आल्याची माहिती आहे. कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेने केलेल्या कारवाईवरही न बोलण्याच्या सूचना शिवसेना नेत्यांना करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच संजय राऊत यांनी देखील या वादावर सविस्तरपणे बोलण्यास नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. 

मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केल्याचा आरोप विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर केला जात आहे. 

हेही वाचा- आज माझं घर तुटलं, उद्या तुमचा अहंकार मोडेल, कंगनाचा उद्धव ठाकरेंवर संताप

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा