कंगना रणौतविरोधात मुंबईत तक्रार दाखल

अभिनेत्री कंगना रणौतविरोधात मुंबईच्या खार आणि आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कंगना रणौतविरोधात मुंबईत तक्रार दाखल
SHARES

अभिनेत्री कंगना रणौतविरोधात मुंबईच्या खार आणि आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. खार इथं संतोष देशपांडे आणि आझाद मैदानात काँग्रेसचे कार्यकर्ते निजामुद्दीन रायन यांनी तक्रारी दाखल केली आहे. पोलिसांविरोधात वादग्रस्त ट्विट केल्यानं तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदार संतोष देशपांडे यांनी शनिवारी सांगितलं की, 'मी अभिनेत्रीविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. कारण तिच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमानाला तडा गेला आहे. तिनं केलेलं ट्विट भडकाऊ आहेत. त्यामुळे राज्यभरात अनेक निदर्शनं होत आहेत. मुंबई पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही तर मी न्यायालयात जाईन.

देशपांडे पुढे म्हणाले, 'अभिनेत्रीनं केलेलं ट्विट योग्य नाही आणि ही विधानं लोकांना भडकवीत आहेत. तिनं आपल्या बोलण्याच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला आहे. ती लोकांच्या मनात विष पेरण्यासाठी सोशल मीडियाचा देखील दुरुपयोग करत आहे.

या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगना रणौतनं ट्विट केलं होतं की, २००८ मध्ये चित्रपट माफियांनी मला सायको घोषित केलं होतं. एवढंच नव्हे तर २०१६ मध्ये त्यांनी मला जादूटोणा करते असं देखील म्हटलं होतं. २०२० मध्ये महाराष्ट्राच्या एका मंत्र्यानं मला हरामखोर मुलगी म्हटलं होतं. सुशांतच्याहत्येनंतर मी मुंबईत असुरक्षित वाटत आहे. सध्या वादविवाद करणारे योद्धा कुठे आहेत?

कंगना अलीकडेच म्हणाली की, तिला चित्रपट माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती आहे. ते पुढे म्हणाले की, मुंबईत मला एकतर हिमाचल प्रदेश पोलिसांना सुरक्षा पुरवावी किंवा थेट केंद्राकडून संरक्षण मिळावे. त्यानंतर कंगनाला केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा मिळाली आहे. यासाठी तिनं अमित शहा यांचे आभार देखील मानले.

अभिनेत्रीनं मुंबई पोलीसांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील लेखात म्हटलं होतं की, मुंबईत असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी पुन्हा इथं येऊ नये. त्यानंतर तिनं ट्विट करत मुंबईची तुलना पीओकेशी केली. कंगनाच्या ट्वीटनंतर महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी तिच्याविरोधात निदर्शनं केली. तिचे पोस्टर पेटवले.



हेही वाचा

केंद्रीय गृहखात्याकडून कंगना रणौतला Y दर्जाची सुरक्षा

सुशांत आत्महत्या प्रकरण : अभिनेत्री रियाला होऊ शकते केव्हाही अटक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा