• ‘करार’ टीमने केला ख्रिसमस सेलिब्रेट
SHARE

मुंबई - डिसेंबर महिना लागला की सगळे जण आतुरतेने वाट पाहतात ती ख्रिसमसची. या महिन्यात सगळीकडे ख्रिसमसची धूम पाहायला मिळते. मग या सेलिब्रेशनमध्ये सेलिब्रिटी तरी कसे मागे राहतील. अभिनेत्री क्रांती रेडकर आणि उर्मिला कानेटकर या दोघींनी ठाण्यातील जागृती पालक संस्थेतील विशेष मुलांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट केला. या दोघींचा लवकरच करार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हाच आनंद या दोघींनी विशेष मुलांसोबत वाटून त्यांचाही आनंद द्विगुणीत केलाय. 13 जानेवारी 2017 ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या