पाहा करिना आणि तैमूरचा क्युट फोटो

 Mumbai
पाहा करिना आणि तैमूरचा क्युट फोटो

मुंबई - सेलिब्रिटींचे लाइफ कधीच गुप्त राहत नाही, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. कलाकारांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांना असतेच. मग ते त्यांच्या सिनेमांबद्दल असो किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल असो. मग ते अगदी साधा फोटो का असेना, करिनाच्या बाबतीत तसेच काहीसं घडलंय. 

सोशल मीडियावर करिना आणि तिचा मुलगा तैमूर यांचा एक फोटो व्हायरल होतोय. खरंतर सैफ आणि करिनाच्या लहानग्याचा हा पहिलाच फोटो नाही. यापूर्वी देखील तैमूरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोवर सोशल मीडियामध्ये अक्षरश: लाइकचा पाऊस पडत आहे.


करिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवर नुकतेच दोन फोटो पोस्ट केले असून, या दोन्ही फोटोंना हजारो लाइक्स आणि कमेंट मिळत आहेत. करिनासोबतच्या फोटोला 11 हजारच्यावर लाइक्स मिळाले आहेत. तर तैमूरच्या फोटोला तब्बल 66 हजार 579 लाइक आणि 890 कमेंट आल्या आहेत.

त्याच्या जन्मावेळी त्याच्या नावावरून मोठा वाद निर्माण झाला होता. शिवाय त्याचं नाव ट्विटरवरही ट्रेंडिंगमध्ये होतं. या फोटोमुळे तो पुन्हा एकदा ट्रेंडिंगमध्ये आला आहे.

Loading Comments