Advertisement

गरोदर करिनाचा रॅम्पवॉक


गरोदर करिनाचा रॅम्पवॉक
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरसाठी रविवारचा दिवस खास ठरला. कारण गरोदर करिनानं चक्क लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये रॅम्पवॉक केला. फॅशन डिझायनर सब्या साचीने डिझाईन केलेला अतिशय भरजरी ऑलिव्ह ग्रीन रंगाचा लेंहगा, कुर्ती पॅटर्न चोळी आणि दुपट्टा यावेळी करीनानं परिधान केला होता. तर मांग टिक्यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुललं होतं. हा रॅम्पवॉक कायम लक्षात राहील, कारण मी आणि बाळानं पहिल्यांदाच एकत्र रॅम्पवॉक केला, असं करिना म्हणाली. रॅम्पवॉकनंतर करिना अतिशय भावूक झाली होती. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा