Advertisement

कार्तिक आर्यनचा 'धमाका', OTT प्लॅटफॉर्मवर अक्षय, वरूणला टाकलं मागे


कार्तिक आर्यनचा 'धमाका', OTT प्लॅटफॉर्मवर अक्षय, वरूणला टाकलं मागे
SHARES

कार्तिक आर्यन स्टारर 'धमाका' हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकला गेलेला आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे. रिपोर्ट्सनुसार, कार्तिकच्या या चित्रपटानं अभिनेता वरुण धवन तसंच सुपरस्टार अक्षय कुमार यांच्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

वरुणच्या 'कुली नं. 1' ( अ‍ॅमेझॉन प्राइम) आणि अक्षयच्या 'लक्ष्मी' (डिस्ने प्लस हॉटस्टार) चे डिजिटल हक्क अनुक्रमे ९० कोटी आणि ११० कोटीला विकले गेले होते.

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, धमाकासाठी नेटफ्लिक्सनं १३५ कोटींचा करार केला आहे. 'धमाका'चे वैशिष्ट्य म्हणजे हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत २४ तासांचा थ्रिलर फॉर्मॅट चित्रपट आहे.

मार्चमध्ये 'धमाका'चा टीझर रिलीज झाला होता. राम माधवानी दिग्दर्शित हा चित्रपट 'द टेरर लाइव्ह' या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात कार्तिक शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरूद्ध लढत असलेल्या पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्या या पात्राचं नाव अर्जुन पाठक आहे.

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये 'धमाका'चं शूटिंग अवघ्या १० दिवसात पूर्ण झालं. इतक्या कमी वेळात चित्रीकरण पूर्ण करणारा हा मेन स्ट्रीममधील पहिला चित्रपट आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक राम माधवानी यांनी शूटवर जाण्याआधी प्री-प्रॉडक्शनवर जास्त काम केले होते. त्यांनी मुंबई विमान तळाजवळील हॉटेलचे सर्व खोल्या १० दिवसांसाठी बुक केल्या होत्या. प्रत्येक दृश्य ७ कॅमेरा सेटअपनं शूट केलं होतं. त्यामुळे सर्व कलाकाराचे हावभाव एकाच वेळी कॅमेऱ्यात कैद झाले.

प्रत्येक कलाकारानं सेटवर किमान चार रीटेक घेण्याचा विचार केला होता. योगायोगाने, कार्तिक आर्यन, अमृता सुभाष आणि मृणाल ठाकूर इत्यादींनी दोन ते तीन रीटॅकमध्ये शूट केलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण टीम बायो बबलमध्ये होती. चित्रपटाचे काहीच दृश्य आउटडोअर चित्रीत करण्यात आले. चित्रपटाच्या यूनिटमध्ये 300 लोक होते. प्रोडक्शन टीमने संपूर्ण हॉटेल बुक केले होते. बाहेरील व्यक्तीला हॉटेलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नव्हती.



हेही वाचा

इरफान खानचा मुलगा बाबीलचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा