Advertisement

विकी कौशल-कतरिना कॅफ अडकले लग्नबंधनात, पहा फोटो

९ डिसेंबरला अभिनेता विकी कौशल आणि आभिनेत्री कतरिना कैफ या जोडीनं अखेर सात फेरे घेतले आहेत.

विकी कौशल-कतरिना कॅफ अडकले लग्नबंधनात, पहा फोटो
file photo
SHARES

९ डिसेंबरला अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि आभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) या जोडीनं सात फेरे घेतले आहेत. राजस्थानमधील सवाई माधोपूर इथल्या सिक्स सेन्स फोर्ट इथं हा विवाह सोहळा पार पडला. दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसोबत मेहंदी आणि संगीत समारंभ पार पडला.

मर्दाना महालासमोरील मोकळ्या बागेत दोघांनी सात फेरे घेतले. लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही खास पाहुणे उपस्थित होते. 


बॉलिवूडची सुपरस्टार जोडी विकी कौशल आणि कतरीना कैफ अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. अनेक भन्नाट पोस्ट सध्या विकी आणि कतरीनाच्या लग्नाच्य व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणा बाहेरील फोटो समोर आले आहेत. विकी आणि कतरिनानं प्रायव्हसीची विशेष काळजी घेतली आहे. त्यासाठी त्यानं पाहुण्यांना आपला फोन हॉटेलच्या खोलीत ठेवण्यास आणि फोटो शेअर न करण्यास सांगितलं आहे. सुरक्षा रक्षकांनी राजवाडा आणि खिडक्या काळ्या कपड्याने झाकल्या आहेत, जेणेकरून कोणीही वधू-वरांचे फोटो, व्हिडिओ काढू नये.

लग्नात सहभागी होण्यासाठी अभिनेता अर्जुन कपूर हॉटेल सिक्स सेन्स फोर्टमध्ये पोहोचला आहे. अभिनेता अक्षय कुमार, सारा अली खान आणि आलिया भट्ट देखील हजर राहणार आहेत.

चित्रपट निर्माता करण जोहर आणि कोरिओग्राफर फराह खान लग्नासाठी काल रात्री उशिरा सवाई माधोपूर येथील हॉटेल ताज येथे पोहोचले. त्यानंतर दोघांनीही हॉटेलच्या खोलीबाहेर 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाच्या गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या दोघांचा डान्स करतानाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.हेही वाचा

प्रियंका चोप्राची आई संतापली, घटस्फोटाच्या वृत्तावर म्हणाली...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा