Submitting your vote now...
पॉवर प्लेमध्ये कोणता संघ अधिक धावा करेल?
*One Lucky Winner per match. Read T&C
व्होट केल्याबद्दल धन्यवाद. कृपया तुमची माहिती खाली भरा, म्हणजे तुमच्या संपर्कात रहाणं सोपं होईल.
Enter valid name
Enter valid number

केतकीला लाभली राहुलची 'साथ...'


  • केतकीला लाभली राहुलची 'साथ...'
SHARE

अभिनयासोबतच गायनाचेही गुण अंगी असलेली अभिनेत्री केतकी माटेगावकर सध्या अभिनयापेक्षा गायनातच जास्त रमलेली दिसते. बऱ्याचदा स्वत:च्याच व्यक्तिरेखांसाठी आवाज देणारी केतकी मागील काही दिवसांपासून इतरही अभिनेत्रींसाठी गायन करत आहे. आता यात मालिकेच्या टायटल ट्रॅकचाही समावेश झाला आहे. केतकीनं राहुल वैद्यच्या साथीनं 'साथ दे तू मला' या मालिकेचं टायटल ट्रॅक गायलं आहे.


साथ दे तू मला

तरुणाईसोबतच अबालवृद्धांना आपल्या अवीट सुरांनी मोहून टाकणाऱ्या गायकांपैकी आघाडीचं नाव म्हणजे केतकी माटेगावकर आणि  राहुल वैद्य. ११ मार्चपासून स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणाऱ्या 'साथ दे तू मला' या मालिकेचं टायटल ट्रॅक राहुल आणि केतकीच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. संगीतकार निलेश मोहरीरनं या गाण्याला संगीत दिलं असून, गीतकार श्रीपाद जोशीच्या लेखणीतून हे गाणं अवतरलं आहे.


स्पेशल गाणं

'साथ दे तू मला' या मालिकेचं टायटल ट्रॅक गाण्याविषयी केतकी म्हणाली की, 'साथ दे तू मला' मालिकेच्या निमित्तानं खूप सुंदर शीर्षक गीत गाण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. राहुल वैद्यसोबत हे गाणं गाताना खूपच मजा आली. गाण्याचे शब्द खूप सुंदर तसंच अर्थपूर्ण आहेत. निलेश मोहरीर यांनी अप्रतिम म्युझिक दिलं आहे. हे टायटल ट्रॅक पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा होत राहते. माझ्या आजवरच्या गाण्यांपैकी हे खूपच स्पेशल गाणं आहे. प्रेक्षकांच्या मनावर हे गाणं नक्कीच रुंजी घालेल याची खात्री असल्याची भावनाही केतकीनं व्यक्त केली.


फॅशन डिझायनरची गोष्ट

या गाण्याविषयी राहुल म्हणाला की, एखादी चाल जशी मनात घर करुन जाते तसंच काहीसं या गाण्याच्या बाबतीत म्हणता येईल. मला स्वत:ला हे गाणं खूप आवडलं आहे. स्टार प्रवाहसोबत खूप जुने ऋणानुबंध आहेत. या गाण्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा हे बंध घट्ट झाल्याची भावना राहुलने व्यक्त केली. 'साथ दे तू मला' ही गोष्ट आहे प्राजक्ताच्या स्वप्नांची. फॅशन डिझायनर बनण्याची इच्छा असणाऱ्या प्राजक्ताला आपल्या क्षेत्रात खूप नाव कमवायचं आहे. करिअरसाठी सर्वांवर पाणी सोडणाऱ्यांपैकी ती नाही. 


स्त्रियांचं प्रतिनिधित्व

प्राजक्ताला घर-संसार सांभाळून आपल्या स्वप्नांना गवसणी घालायची आहे. खरं तर घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत कुशलरित्या करणाऱ्या तमाम स्त्रियांचं प्राजक्ता प्रतिनिधित्व करते. यामुळेच 'साथ दे तू मला' या मालिकेची गोष्ट प्रत्येकाला आपलीशी वाटेल. प्राजक्ताला तिची स्वप्न पूर्ण करण्यात कशी आणि कुणाकुणाची साथ मिळणार याची रंगतदार गोष्ट या मालिकेत पाहायला मिळेल. आशुतोष कुलकर्णी, प्रियांका तेंडोलकर, सविता प्रभुणे, अरुण नलावडे, मेघना वैद्य, रोहन गुजर, प्रिया मराठे, पियुष रानडे आदी कलाकारांच्या या मालिकेत भूमिका आहेत.हेही वाचा - 

आगीशी खेळल्यानं ट्विंकलची अक्षयला धमकी!

पश्चिम महाराष्ट्राची मुलगी बनली विदर्भाची 'राजकन्या'
संबंधित विषय