Advertisement

‘KGF Chapter 2’च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर, 'ही' आहे तारीख

KGF 2च्या चाहत्यांना आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाहीय.

‘KGF Chapter 2’च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर, 'ही' आहे तारीख
SHARES

कन्नड सुपरस्टार यशचा (Yash) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘KGF Chapter 2’च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. KGF 2च्या चाहत्यांना आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाहीय.

२७ मार्च रोजी संध्याकाळी केजीएफ २चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नीलने याबाबतचे पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे.

ट्रेलरच्या रिलीज डेटची घोषणा करताना प्रशांत नीलनं लिहिलं की, ‘वादळापूर्वी नेहमीच गडगडाट होत असतो. KGF chapter2चा ट्रेलर २७ मार्च रोजी संध्याकाळी ६.४० वाजता प्रदर्शित होणार आहे.’

पोस्टरमध्ये यशचा ‘अँग्री यंग मॅन लूक’ दिसत आहे. या पोस्टरमध्ये यशच्या क्लोज अप फोटोसह ट्रेलर रिलीजची तारीख आणि वेळ देण्यात आली आहे. यासोबतच चित्रपट १४ एप्रिल २०२२ रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होईल, असंही सांगण्यात आलं आहे.

KGF 2 तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्येही रिलीज होणार आहे. फरहान अख्तर, KGF Chapter 2च्या हिंदी आवृत्तीचा निर्माता असणार आहे. KGF Chapter 2ची कथा तिथूनच सुरू होईल, जिथे चित्रपटाचा पहिला भाग संपला होता.

यावेळी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननेही KGF 2मध्ये एंट्री केली आहे. ती यात पंतप्रधानाची भूमिका साकारत आहे. यासोबतच श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. संजय दत्त मुख्य खलनायक ‘अधीरा’च्या भूमिकेत दिसणार आहे.



हेही वाचा

दिग्दर्शक महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

'तारक मेहता...' नव्या अवतारात 'या' ओटीटीवर प्रदर्शित

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा