Advertisement

'तारक मेहता...' नव्या अवतारात 'या' ओटीटीवर प्रदर्शित

आता ही मालिका नवीन अवतारात पण सेम पात्रांसह लाँच होणार आहे.

'तारक मेहता...' नव्या अवतारात 'या' ओटीटीवर प्रदर्शित
SHARES

छोट्या पडद्यावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. आता ही मालिका नवीन अवतारात लाँच होणार आहे.

जगातील प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix वर २४ फेब्रुवारी २०२२ पासून 'तारक मेहता का छोटा चष्मा' या नवीन अवतारात लॉन्च होणार आहे.

जेठालाल (दिलीप जोशी), टप्पू सेना आणि गोकुळधामचे सर्व शेजारी पण संपूर्ण शो 'अॅनिमेटेड' स्वरूपात असेल. हा अॅनिमेटेड शो जगातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या कॉमेडी टेलिव्हिजन शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' वर आधारित आहे.

२०२१ मध्ये लाँच झालेल्या याच अॅनिमेटेड शोचे आतापर्यंत २ सीझन झाले आहेत. अॅनिमेटेड मालिकेत गोकुळधाम सोसायटीची पात्रे एका अनोख्या, कॉमिक स्वरूपात दाखवली गेली आहेत आणि मुलांमध्येही ती खूप प्रसिद्ध आहेत.

असित कुमार मोदी यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या शोची निर्मिती केली आहे. असित कुमार मोदी म्हणाले, “हे स्पष्ट आहे की जर तुमची कथा उत्तम असेल तर ती अनेक प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या अवतारांमध्ये आणली जाऊ शकते.

असित मोदी म्हणाले, मनोरंजनासोबत समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी 'तारक मेहता का छोटा चष्मा' ही मालिका ओटीटीवर घेऊन येण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ओटीटीमुळे 'तारक मेहता का छोटा चष्मा' मालिकेचा प्रेक्षकवर्ग देखील वाढेल.

मिळालेल्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा त्याच्या फायर टीव्ही डिव्हाइसवर हिंदीमध्ये सर्वाधिक सर्च केलेला टेलिव्हिजन शो घोषित करण्यात आला होता.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात कौटुंबीक आणि विनोदी मालिका म्हणून आपलं स्थान निर्माण केलं आहे.

या मालिकेचे आतापर्यंत ३३०० हून अधिक भाग पूर्ण झाले आहेत. तसेच मराठीत 'गोकुळधामची दुनियादारी' आणि तेलुगुमध्ये 'तारक मामा आयो रामा' या नावाने मालिका प्रसारित होत आहे.हेही वाचा

‘झुंड’चा ट्रेलर प्रदर्शित, परश्या-आर्ची पुन्हा एकत्र

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा