माहिम - मुलं म्हणजे देवाघरची फुलं. हीच फुलं तुम्हा सर्वांना काही तरी सागतायेत. निरागसता, लोभस हावभाव छोट्या मुलांची खासियत. मोठ्या कळवळीनं ही मुलं वाढते प्रदूषण आणि त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास यावर खूप चांगला संदेश देतायेत. बालदिनानिमित्त बालनाट्य महोत्सवाचं आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्य संकूलात करण्यात आलेलं. यावेळी शहाणपण देगा देवा, हॅलो ब्रदर अशा नाटकांचं सादरीकरण झालं. वाईट संगतीत राहिल्यानंतर मुलं कशी बिघडतात यावर आधारीत आई मला क्षमा कर नाटकाचं सादरीकरणही या छोटयांनी केलं.
बालनाट्य महोत्सवात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, श्री चिंतामणी नाट्यसंस्थेच्या निर्मात्या लता नार्वेकरही उपस्थित होत्या. महोत्सवाआधी बालनाट्य लेखन स्पर्धा घेण्यात आली. महोत्सवा दरम्यान स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. खरच या मुलांना पाहून लहानपण दे रे देवा असचं बोल तोंडी येतायेत.