‘मिरची कोल्हापूरची’वर थिरकणार सोनाली राऊत

Malad West, Mumbai  -  

गोरेगाव - मराठी सिनेमानं कात टाकलीय. त्यामुळेच की काय आता बॉलिवूड स्टार देखील मराठी सिनेमांकडे वळू लागलेत. आता किंगफिरशची मराठमोळी कॅलेंडर गर्ल बनलेली आणि बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवलेली सोनाली राऊत मराठी सिनेमासाठी सज्ज झालीय. हिरो या आगामी सिनेमामध्ये ' मिरची कोल्हापूरची' या गाण्यावर ती थिरकताना दिसणारेय. आणि ज्याचं चित्रकरण चित्रनगरीमध्ये संपन्न झालंय. सोनाली सोबत या गाण्यावर चित्रपटातील नायक भूषण पाटील थिरकताना प्रेक्षकांना पाहायला मिळणारेय. या गाण्याची कोरियोग्राफी फुलवा खामकरनं केलीय.

Loading Comments