अभिनेता अर्जुन कपूरवर येस बँक बुडवण्याचा आरोप

अभिनेता अर्जुन कपूरवर येस बँक बुडवण्याचा आरोप करण्यात आला आहे.

अभिनेता अर्जुन कपूरवर येस बँक बुडवण्याचा आरोप
SHARES

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) येस बँकेवर (YES bank) निर्बंध लादलेत. ज्यामुळे ग्राहकांना मोठा फटका सहन करावा लागतो आहे. आता या प्रकरणात आणखी एक नाव समोर आलं आहे ते म्हणजे अर्जुन कपूरचं. येस बँकेवर ओढवलेल्या परिस्थितीचं खापर कमाल खाननं (kamal khan) अभिनेता अर्जुन कपूरवर (arjun kapoor)फोडलं आहे. येस बँकेच्या या परिस्थितीला अर्जुन कपूर जबाबदार आहे, असं म्हणत कमाल खाननं अर्जुन कपूरला टोला लगावला आहे.


येस बँक प्रकरणाशी अर्जुन कपूरचा संबंध जोडत कमाल खानने खोचक असं ट्विट केलं आहे. कमाल खाननं या ट्विटमध्ये म्हटलं आहे,'अर्जुन कपूरने आतापर्यंत ज्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे ते सर्व चित्रपट जवळपास बुडाले आहेत. त्याचा '2 स्टेट' हा चित्रपट मात्र सुपरहिट ठरला, या चित्रपटात तो येस बँकेत काम करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं आणि आता तर येस बँकच बुडाली.'


कमाल खाननं केलेल्या ट्विटवर अर्जुन कपूरच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी हे मेजेशीररीत्या घेतलं आहे.

दरम्यान येस बँकेच्या खातेदारांना ५ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून SBI चे माजी मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खातेदारांनी घाबरू नये, असं आवाहनही रिझर्व्ह बँकेनं केलं आहेहेही वाचा

'बधाई हो' चित्रपटाचा येणार सिक्वेल, आयुषमानच्या जागी राजकुमारची वर्णी

संबंधित विषय