Advertisement

'बधाई हो' चित्रपटाचा येणार सिक्वेल, आयुषमानच्या जागी राजकुमारची वर्णी

‘बधाई हो’च्या सिक्वेलमध्ये अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) दिसणार आहे. तर त्याच्यासोबत भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) स्क्रीन शेअर करणार आहे.

'बधाई हो' चित्रपटाचा येणार सिक्वेल, आयुषमानच्या जागी राजकुमारची वर्णी
SHARES

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ (Badhai Ho)नं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आयुष्मान खुराना आणि सायना मल्होत्रा या जोडीच्या रोमान्सपेक्षा नीना गुप्ता आणि गजराज राव यांचा रोमँटिक अंदाज जास्त भावला. आयुष्मानच्या इतर चित्रपटांप्रमाणेच यामधून सुद्धा एक दैंनदिन जीवनाशी निगडीत संदेश देण्याचा प्रयत्न केला होता

एकंदरित हा सिनेमा म्हणजे ‘एंटरटेनमेंट’चं एक पूर्ण पॅकेज होता. तर आता या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यातील ट्विस्ट म्हणजे 'बधाई हो' मधील मुख्य भूमिका साकारणारे आयुष्मान खुराना आणि सानया मल्होत्रा या सिनेमामध्ये नसणार आहेत. तर या दोघांच्या जागी आणखी एक भन्नाट जोडी असणार आहे.

बधाई हो’च्या सिक्वेलमध्ये अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) दिसणार आहे. तर त्याच्यासोबत भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) स्क्रीन शेअर करणार आहे. दोघंही तोडीस तोड कलाकार असल्यामुळे हा चित्रपट देखील ‘बधाई हो’ प्रमाणेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही. पण या चित्रपटाचं नाव 'बधाई हो'च्या एवजी 'बधाई दो' असं असणार आहे.

या चित्रपटामध्ये काम करण्यास राजकुमार आणि भूमी दोघांनीही उत्सुकता दाखवली आहे. राजकुमार या चित्रपटात असणार आहे, हे आधीच घोषित झालं होतं. मात्र त्याच्याबरोबर भूमिच्याही नावाची वर्णी लागल्यामुळे तिचे चाहतेही खूप उत्सुक आहेत. दरम्यान ‘बधाई हो’ च्या फ्रँचायझीमध्ये काम करण्याची आधीपासून इच्छा होती अशी प्रतिक्रिया भूमीनं दिली आहे.

बधाई हो’ या चित्रपटाची आणखी एक गंमत म्हणजे या सिनेमाचं नाव ‘बधाई दो’ असणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर भूमी पीटी शिक्षकेच्या भूमिकेत दिसेल. दरम्यान या चित्रपटाचं शूटिंग जूनमध्ये सुरू होणार असून २०२१ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

तसंच, अमित शर्मा 'बधाई हो २' या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार नाहीत. तर अमित शर्माऐवजी दुसऱ्या एका दिग्दर्शकाकडे चित्रपटाची जबाबदारी सोपवली आहे. आयुष्मान खुराना आणि अमित शर्मा या दोघांचीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. पण चित्रपटात आयुष्मान नसल्यामुळे त्याचे चाहते निराश होतील हे मात्र नक्की. 'बधाई हो' हा आयुष्मान खुरानाच्या कारकीर्दीचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. यानंतर आयुष्मान खुरानाचे अनेक चित्रपट आले आणि त्यांना समीक्षक, चाहते आणि बॉक्स ऑफिसकडून खूप प्रेम मिळाले.



हेही वाचा

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनासाठी सरकारकडून १० कोटी

रणदीप हुडाची हॉलिवूडमध्ये एन्ट्री, अॅव्हेंजरमधल्या स्टारसोबत झळकणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा