Advertisement

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनासाठी सरकारकडून १० कोटी

अखिल भारतीय नाट्यसंमेलन अवघ्या २० दिवसांवर आलं आहे. दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला राज्य सरकारकडून ५० लाख रुपये मिळत होते. यंदा भरघोस मदत मिळाल्याने नाट्यकर्मींनी आनंद व्यक्त केला आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनासाठी सरकारकडून १० कोटी
SHARES

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनासाठी (100th akhil bharatiya marathi natya sammelan) यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नुकतंच अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात आल्याने नाट्यसंमेलनाला मजबूत आर्थिक पाठबळ मिळालं आहे. सांगली (sangli) येथून सुरू होणारं अखिल भारतीय नाट्यसंमेलन अवघ्या २० दिवसांवर आलं आहे. दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला राज्य सरकारकडून ५० लाख रुपये मिळत होते. यंदा भरघोस मदत मिळाल्याने नाट्यकर्मींनी आनंद व्यक्त केला आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ८० दिवस ११ ठिकाणी होणाऱ्या या नाट्यसंमेलनासाठी १० कोटी रुपये सरकारकडून मिळणार असल्याने  नाट्यसंमेलनाला आर्थिक पाठबळ लाभल्याची भावना व्यक्त करत राज्य सरकारचे आभार मानले. या संमेलनानंतर नव्या रंगशतकाची सुरुवात होईल. नाटक हे ग्रामीण भागातून शहरांपर्यंत आले. त्यानंतर शहरी भागात व्यावसायिक रंगभूमी रमली. मात्र आता या संमेलनाच्या निमित्ताने ही रंगभूमी पुन्हा ग्रामीण भागाकडे नेण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं. 

मावळते नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी नाट्यसंमेलनासाठीला १० कोटींचा निधी मिळाल्याबाबत आनंद व्यक्त केला. परिषदेने ५० कोटींचे ध्येय ठेवले होते, मात्र आता १० कोटीने काम भागणार असेल तर हा आनंदाचा भाग आहे, असे ते म्हणाले. अभिनेते मोहन जोशी यांनीह या निर्णयाचे स्वागत करून हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कष्टाचे चीज असल्याचं म्हटलं आहे. 

नाट्य संमेलन पहिला टप्पा महाराष्ट्रात (Maharashtra) पार पडेल. तर दुसरा टप्पा भारतात पार पडेल. शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल (Dr. Jabbar Patel) यांची निवड करण्यात आली आहे

असा असेल कार्यक्रम

  • ५ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan) सुरुवात होईल. व्यंकोजीराजे यांनी १९ नाटके लिहिली आहेत. यादिवशी त्यांच्या नाट्यसंपदेला तंजावर येथे अभिवादन करण्यात येईल. 
  • २६ मार्चला रोजी सांगली (sangli) मध्ये नाट्यदिंडी होईल. यादिवशी संध्याकाळी सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘सीता स्वयंवर’ या संगीत नाटकाचा प्रयोग होईल.
  • २७ मार्च ते २९ मार्च दरम्यान नाट्य संमेलनाचा सोहळा
  • त्यानंतर संमेलनाच्या महाराष्ट्रातील टप्प्याला सुरुवात होईल.
  • ३० मार्च ते ७ जून दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी छोटी छोटी संमेलन होतील.
  • राज्यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखा ज्या ठिकाणी आहेत तिथे हा उपक्रम पार पडेल.
  • मुंबईत ८ ते १४ जून दरम्यान समारोप सोहळ्यात 



हेही वाचा -

‘असं’ आहे मनसेचं शॅडो कॅबिनेट, ठेवणार ठाकरे सरकारवर वचक

तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक… आव्हाडांना खुलं आव्हान



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा