Advertisement

‘असं’ आहे मनसेचं शॅडो कॅबिनेट, ठेवणार ठाकरे सरकारवर वचक

मनसे नेते अनिल शिदोरे यांनी या प्रतिरूप कॅबिनेटची घोषणा केली. एकून २८ नेत्यांचं हे शॅडो कॅबिनेट असून यामध्ये मनसेचे नेते अमित ठाकरे (amit thackeray) यांचाही समावेश आहे.

‘असं’ आहे मनसेचं शॅडो कॅबिनेट, ठेवणार ठाकरे सरकारवर वचक
SHARES

ठाकरे सरकारवर वचक ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (Mns) सोमवारी ‘शॅडो कॅबिनेट’ची (shadow cabinet,) घोषणा करण्यात आली. मनसेच्या १४ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त नवी मुंबई, वाशीतील विष्णूदास भावे सभागृहात आयोजित कार्यक्रमात मनसे नेते अनिल शिदोरे यांनी या प्रतिरूप कॅबिनेटची घोषणा केली. एकूण ३० पेक्षा जास्त नेत्यांचं हे शॅडो कॅबिनेट असून यामध्ये मनसेचे नेते अमित ठाकरे (amit thackeray) यांचाही समावेश आहे.

‘शॅडो कॅबिनेट’ ही संकल्पना पाश्चिमात्य देशात खासकरून ब्रिटनमध्ये (britain) रुढ आहे. सत्ताधारी पक्षाच्या कामांवर वचक ठेवण्यासाठी विरोधी पक्षाकडून (opposition party) ‘शॅडो कॅबिनेट’ची (Shadow cabinet) स्थापना केली जाते. म्हणजे ज्याप्रमाणे सरकारमध्ये गृह, अर्थ, परराष्ट्र, व्यापार अशा वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी प्रत्येक नेत्याकडे सोपवली जाते. त्याचप्रमाणे विरोधी पक्षाकडूनही ‘शॅडो कॅबिनेट’च्या माध्यमातून प्रत्येक नेत्याकडे ठराविक विभागची (department) जबाबदारी देण्यात येते. त्यानुसार ‘शॅडो कॅबिनेट’मधील हे नेते प्रत्येक विभागावर नजर ठेवतात. तसंच सरकारने  (government) घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची पडताळणी हे ‘शॅडो कॅबिनेट’ करतं.  यामुळे सरकारच्या (ruling party) कामावर वचक निर्माण होतो.

याआधी महाराष्ट्रात (maharashtra) २००५ मध्ये आघाडी सरकारच्या काळात शिवसेना (shiv sena) आणि भाजपने (bjp) देखील ‘शॅडो कॅबिनेट’चा प्रयोग केला होता. देशात मध्य प्रदेश, केरळ आणि गोव्यातही असा प्रयोग करण्यात आला होता. 

शॅडो कॅबिनेटची जबाबदारी ‘या’ नेत्यांवर:

  • गृह विधी व न्याय, जलसंपदा आणि सामान्य विभाग - बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजीव उबंरकर, प्रवीण कदम, योगेश खैरे, प्रसाद सरफरे, दिपक शर्मा
  • जलसंपदा - अनिल शिदोरे
  • मराठी भाषा - अमित ठाकरे, अनिल चौपडे
  • वित्त आणि गृहनिर्माण - नितीन सरदेसाई
  • महसूल - अनिल अभ्यंकर, दिलीप कदम, संदीप पाचंगे
  • उर्जा - शिरीष सावंत, मंदार हळबे, सागर देवरे, विनय भोईटे
  • ग्रामविकास - जयप्रकाश बावीस्कर, अमित ठाकरे, अनिल शिदोरे, सुरेश शिंदे
  • वने, आपत्ती व्यवस्थापन - संजय चित्रे, अमित ठाकरे, संतोष धुरी, आदित्य दामले 
  • शिक्षण - अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर - उच्चशिक्षण, सुधाकर तांबोळी, अमोल रोगे
  • कामगार - राजेंद्र वागस्कर, गजानन राणे, सुरेंद्र सुर्वे
  • नगरविकास पर्यटन- संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरोले, हेमंत कदम, योगेश चिले
  • सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण - रिटा गुप्ता, कुंदा राणे
  • सहकार आणि पणन - दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमये
  • अन्न व नागरी पुरवठा - राजा चौगुले, विशाल पिंगळे
  • मत्स्यविकास आणि बंदरे - परशुराम 
  • महिला व बालविकास - शालिनी ठाकरे  
  • सार्वजनिक बांधकाम- संजय शिरोडकर
  • रोजगार हमी आणि फलोत्पादन - बाळा शेडगे
  • सांस्कृतिक कार्य - अमेय खोपकर 
  • कृषी व दुग्धविकास - 
  • कौशल्य विकास - स्नेहल जाधव 
  • सामाजिक न्याय - संतोष सावंत
  • ग्राहक सरंक्षण- प्रमोद पाटील 
  • क्रीडा व युवककल्याण -
  • अल्पसंख्यांक - अल्ताफ खान, जावेद तडवी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा