Advertisement

रणदीप हुडाची हॉलिवूडमध्ये एन्ट्री, अॅव्हेंजरमधल्या स्टारसोबत झळकणार

'एक्सट्रॅक्शन' २४ एप्रिल २०२० रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

रणदीप हुडाची हॉलिवूडमध्ये एन्ट्री, अॅव्हेंजरमधल्या स्टारसोबत झळकणार
SHARES

अभिनेता रणदीप हुडा लवकरच नेटफ्लिक्सच्या 'एक्सट्रॅक्शन' या चित्रपटाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूकदेखील समोर आला आहे. यामध्ये तो हातात गन धरलेला दिसत आहे.


अॅक्शन सीन्स करण्याची संधी

आपल्या हॉलिवूड डेब्यूबद्दल बोलताना रणदीपने सांगितले की, 'मला या चित्रपटात बरेच अ‍ॅक्शन सीन्स करायला मिळाले. हॉलिवूड चित्रपटात अॅक्शन पॅक असलेली भूमिका करणारा मी बहुतेक पहिला भारतीय पुरुष अभिनेता असू शकतो. हेम्सवर्थ, रूसो ब्रदर्स आणि दिग्दर्शक सॅम हाग्रेव्ह यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता.'


दिवसातून दोनदा रिहर्सल

चित्रपटात त्याचे वर्णन विध्वंसक व्यक्तीच्या रुपात करण्यात आले आहे. जो आधी सैन्यात नोकरी करायचा आणि मग तो दुसऱ्यासाठी काम करायला लागला. आपल्या भूमिकेविषयी रणदीप म्हणाला की, 'मी आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये फक्त नाट्यमय भूमिका केल्या आहेत. चित्रपटाच्या अॅक्शन सिक्वेन्ससाठी मला दहा दिवस दिवसातून दोनदा सराव करावा लागला.' चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं देखील त्यानं तोंडभरून कौतुक केलं. "मला एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की, मी आजवर असा दिग्दर्शक पाहिला नाही जो माझ्या शेजारी वायरवर लटकून दिग्दर्शन करतो."


ख्रिस हेम्सवर्थ मुख्य भूमिकेत

चित्रपटात हॉलिवूड स्टार ख्रिस हेम्सवर्थ मुख्य भूमिकेत आहे. अॅव्हेंजर्स अॅण्डगेम फेम रुसो ब्रदर्सच्या जोडीपैकी एक आहे. सॅम हाग्रेव्ह यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. 'एक्सट्रॅक्शन' २४ एप्रिल २०२० रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. या चित्रपटाशिवाय रणदीप आगामी ‘राधे’ या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. जो ईद २०२० मध्ये रिलीज होईल. या चित्रपटात सलमान खान आणि दिशा पाटणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.



हेही वाचा

'सूर्यवंशी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, अक्षयला सिंगम आणि सिम्बाची साथ

मुंबईत रंगणार आशियाई चित्रपट महोत्सव

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा