अमिताभ यांनी मानले केकेआरचे आभार

 Bandra west
अमिताभ यांनी मानले केकेआरचे आभार

मुंबई - वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता कमाल आर खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण या वेळी कमाल खान त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत नाही तर एका चांगल्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. बॉलीवूड शेहेनशाह अमिताभ बच्चन यांनी कमाल खानचे मेसेजद्वारे आभार मानले आहेत. हा मेसेज केकेआरने ट्विटरवर शेअर केलाय. आता अमिताभ यांनी केकेआरचे आभार मानायला त्याने असे केले तरी काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

त्याचे झाले असे की 'सरकार 3' या सिनेमाचा ट्रेलर पाहून केकेआरने चित्रपट हिट होणार असा दावा केला होता. त्यासाठी अमिताभ यांनी केकेआरला मेसेज करून त्याचे आभार मानले आणि तुझा दावा खरा होऊदे अशी आशा व्यक्त केली.

Loading Comments