Advertisement

अश्विनी एकबोटेंचा शेवटचा चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित


अश्विनी एकबोटेंचा शेवटचा चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित
SHARES

लहान मुलांच्या आयुष्यावर भाष्य करणारे हल्ली बरेच मराठी चित्रपट बनवले जात आहेत. आता या यादीत आणखीन एका चित्रपटाचा समावेश होणार आहे. लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून मानवी नात्यांचं प्रतिबिंब दाखवणारा 'शुभं करोति कल्याणम्' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दीपा भालेराव यांनी केली आहे.

 


चित्रपटाचं दिग्दर्शन शैलेन्द्र सिंह राजपूत यांनी केलं आहे. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं स्वप्न पाहिलं जातं, तेव्हा लहान मुलं असो वा मोठे, त्यांना प्रचंड कष्टाशिवाय यश मिळत नाही, हे सांगत त्यांना लहान वयातच ‘स्वप्न पाहा आणि ती झटून पूर्ण करा’ हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. एका ध्येयवेड्या मुलाच्या वेगळेपणाची आणि त्याला मिळालेल्या चांगल्या साथीची कथा या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.अश्विनी एकबोटे, सिया पाटील, नरेश बिडकर, अरविंद कोळी, हरिंदर सिंग राणा यांच्यासोबत बालकलाकार तेजल भालेराव, सिद्धेश लिंगायत, विनय शिरसाट, तन्मय म्हात्रे, सानिया पाटील, श्रावणी मेढेकर, राहुल मुळीक, मर्नोवी ओक, सुजल गायकवाड, आकाश शिरसाट यांच्या चित्रपटामध्ये भूमिका आहेत.हेही वाचा

225 फूट उंचीचे चित्र काढून अमिताभना दिले बर्थडे गिफ्ट


संबंधित विषय
Advertisement