उत्तम सिंग यांना लता मंगेशकर अवॉर्ड !

 Pali Hill
उत्तम सिंग यांना लता मंगेशकर अवॉर्ड !

मुंबई - 2016चा गानसम्राज्ञी श्रीमती लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठसंगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक उत्तम सिंग यांना प्रदान करण्याचा निर्णय राज्यशासनाने जाहीर केला आहे. 5 लाख रुपये तसेच मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने उत्तम सिंग यांच्या नावास अनुमोदन दिले. या समितीत सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, श्रीधरफडके, आशा खाडिलकर, स्वानंद किरकिरे, अजय आणि अतुल गोगावले, श्रेया घोषाल यांचा समावेश आहे.

उत्तम सिंग यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची नावे

मैने प्यार किया

हम आपके है कौन

दिल तो पागल है

दुश्मन

फर्ज

दिल दिवाना होता है

गदर एक प्रेम कथा

बागबान

पेंटरबाबू

अंदाज अपना अपना

हॉनर किलींग

रज्जो

कच्ची सडक

द हिरो - द लव्ह स्टोरी ऑफ स्पाय

हम तुम्हारे है सनम

उत्तम सिंग यांना मिळालेले पुरस्कार

दिल तोपागल है या चित्रपटासाठी सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार

गदर एक प्रेम कथा या चित्रपटासाठी सर्वोत्कृप्ट संगीत दिग्दर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार

Loading Comments