विलेपार्लेत दसरा पहाटचे आयोजन

  vile parle
  विलेपार्लेत दसरा पहाटचे आयोजन
  मुंबई  -  

  विले पार्ले- विलेपार्ले येथे दसरा पहाट मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शाश्वत फाऊंडेशनच्या वतीने या दसरा पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. बदलापूरजवळ स्थापन केलेल्या सहवास या निवारा केंद्राच्या मदतीसाठी मार्स इमॅजिनेशन यांच्या सहकार्याने या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ६.३० वाजता दीनानाथ नाट्यगृहात हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात पं. शौनक अभिषेकी, नीलाक्षी पेंढारकर आणि पं. डॉ. राम देशपांडे हे संगीत क्षेत्रातील दिग्गजांना स्वरांजली अर्पण करणार आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.