Advertisement

येत्या रविवारी अनुभवा संभाजीचा महाएपिसोड!


SHARES

छोट्या पडद्यावर आजवर अनेक ऐतिहासिक महापुरूषांच्या गाथा प्रेक्षकांनी अनुभवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, पेशवा बाजीराव, सम्राट अशोक, गौतम बुद्ध, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप अशा अनेक ऐतिहासिक महापुरुषांच्या गाथा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. मात्र, सध्या 'झी मराठी'वरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी 'संभाजी' मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. संभाजी महाराजांवर लहानपणापासूनच जिजाऊंने केलेले संस्कार प्रेक्षकांच्या मनात खोलवर रूजवले ते या मालिकेने. मालिकेतील प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांना इतिहासात घेऊन गेला. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार? याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

येत्या रविवारी १७ डिसेंबरला 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेचा महाएपिसोड प्रेक्षकांना बघता येणार आहे. या एपिसोडमध्ये अभिनेता अमोल कोल्हे संभाजीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मोठ्या सईबाई कोण असतील? याबाबत मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे. मालिकेत आता नवीन कलाकारांची एन्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा