Advertisement

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? नामांकनं जाहीर!


महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? नामांकनं जाहीर!
SHARES

मराठी चित्रपट वाहिनी 'झी टॉकीज' प्रस्तुत सर्वांच्या लाडक्या आणि प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहतात, अशा 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' २०१७' या पुरस्कार सोहळ्याचे नामांकन घोषित करण्यात आलं आहे. 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' हे मराठी सिनेसृष्टीतील एकमेव व्युव्हर्स चॉईस अवॉर्ड्स असून यंदा आठव्या वर्षात पदार्पण करत आहे. या पुरस्कारांसाठी १४ विभागात नामांकन जाहीर झालं असून, ‘फेव्हरेट चित्रपट’, ‘फेव्हरेट अभिनेता’, ‘फेव्हरेट अभिनेत्री’, ‘फेव्हरेट स्टाईल आयकॉन’, ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ ‘फेव्हरेट गीत’ या प्रसिद्ध विभागात कमालीची टक्कर असणार आहे.


फेव्हरेट चित्रपटात यांचा समावेश

‘फेव्हरेट चित्रपट’ या विभागात वेगवेगळ्या शैलीच्या तसेच समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळालेल्या चित्रपटांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी 'फास्टर फेणे', 'व्हेंटिलेटर', 'ती सध्या काय करते', 'बॉईज', 'चि. व चि. सौ. कां.' आणि 'मुरंबा' या चित्रपटांमध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे.


फेव्हरेट अभिनेता

'फास्टर फेणे' आणि 'मुरंबा' या चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी अमेय वाघ याने फेव्हरेट अभिनेता या विभागात २ नामांकनं पटकावली आहेत. त्याचबरोबर 'व्हेंटिलेटर' चित्रपटातील कमाल अभिनयासाठी जितेंद्र जोशी, 'ती सध्या काय करते'मधील सहज सादरीकरणासाठी अंकुश चौधरी, 'चि. व चि. सौ. कां.'मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी ललित प्रभाकर आणि 'बॉईज' चित्रपटात प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी पार्थ भालेराव यांनी विभागात नामांकनं पटकावली आहेत.


फेव्हरेट अभिनेत्री

फेव्हरेट अभिनेत्री या विभागात बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम्हणकर हिने 'जाऊंद्याना बाळासाहेब' मधील सादर केलेली गावरान मुलगी नामांकन पटकावून गेलीय. तसेच, मुक्ता बर्वे हिच्या 'हृदयांतर'मधील प्रेरक कलाकृती, सोनाली कुलकर्णी हिची 'कच्चा लिंबू'मधील अफलातून कामगिरी, पर्ण पेठे हिचा 'फास्टर फेणे'मधील उत्कृष्ट अभिनय, 'चि. व चि. सौ. कां.'मधील मृण्मयीने सादर केलेली व्हेज कन्या आणि 'मुरंबा'मधील गोड मिथिला पालकर यांनी देखील या विभागात नामांकनं पटकावली आहेत.


फेव्हरेट गीत

फेव्हरेट गीत या विभागात जाऊंद्याना बाळासाहेब मधील 'ब्रिंग इट ऑन' आणि 'डॉल्बी वाल्या', बॉईज चित्रपटातील 'लग्नाळू', 'ती सध्या काय करते' या चित्रपाटातील 'हृदयात वाजे समथिंग' तसेच व्हेंटिलेटर मधील 'या रे या' आणि 'बाबा' या गाण्यांचा समावेश आहे.


फेव्हरेट स्टाईल आयकॉन

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते अंकुश चौधरी, आकाश ठोसर, अमेय वाघ, ललित प्रभाकर, वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, अभिनय बेर्डे आणि स्वप्नील जोशी यांनी महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन या विभागात नामांकन पटकावलं आहे.


फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर

सिनेसृष्टीतील स्वप्नसुंदरी अभिनेत्री सई ताम्हणकर, मिथिला पालकर, अमृता खानविलकर, पूजा सावंत, पर्ण पेठे, स्पृहा जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रिया बापट यांनी फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर या विभागात नामांकन पटकावलं आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा