Advertisement

महेश मांजरेकांना अटकेपासून दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

महेश मांजरेकांना अटकेपासून दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
SHARES

‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. माहिम पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तो रद्द व्हावा यासाठी महेश मांजरेकर यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टानं त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.

चित्रपटात अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवल्यानं महेश मांजरेकर यांच्या विरोधात कलम २९२, ३४ तसेच पॉक्सो कलम १४ आणि IT कलम ६७ व ६७ ब अंतर्गत माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच या प्रकरणी न्यायालयानं चौकशीचे आदेश दिले असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.

महेश मांजरेकर यांनी पॉक्सो आणि आयटी कायद्यानुसार दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका केली होती. पण कोर्टानं त्यांना अटकेपासून कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.

हायकोर्टानं महेश मांजरेकरांना नियमित कोर्टाकडे दाद मागण्यास सांगितलं आहे. पण ते खंडपीठ उपलब्ध नसल्यानं महेश मांजरेकरांनी याचिका दाखल करताना दोन दिवस अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. पण कोर्टानं ही मागणी फेटाळून लावली.



हेही वाचा

'तारक मेहता...' नव्या अवतारात 'या' ओटीटीवर प्रदर्शित

‘झुंड’चा ट्रेलर प्रदर्शित, परश्या-आर्ची पुन्हा एकत्र

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा