मलिका-ए-गझल बेगम अख्तर..ठुमरीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी!


  • मलिका-ए-गझल बेगम अख्तर..ठुमरीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी!
  • मलिका-ए-गझल बेगम अख्तर..ठुमरीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी!
SHARE

ठुमरी म्हटलं की सर्वात आधी आणि सर्वात वर घेतलं जातं ते नाव म्हणजे बेगम अख्तर! अख्तरी बाई फैजाबादी असं भारदस्त मूळ नाव असलेल्या बेगम अख्तर यांचा आज म्हणजेच शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 रोजी 103वा जन्मदिवस. भारतीय शास्त्रीय संगीतामधील अजरामर नाव असलेल्या बेगम अख्तर यांच्या 103व्या जन्मदिनी गुगलने खास डूडल करुन त्यांना विशेष श्रद्धांजली वाहिली आहे.7 ऑक्टोबर 1914 रोजी बेगम अख्तर यांचा जन्म झाला. आणि पुढच्या अवघ्या 50 वर्षांच्या कालखंडात हे नाव भारतीय उपखंडात अजरामर झालं. आणि ते झालं बेगम अख्तर यांच्या ठुमरी, गझल आणि दादरा या गायनप्रकारातील जबरदस्त वावरामुळे! त्यामुळेच त्यांना मलिका-ए-गझल म्हणूनही ओळखलं जातं. आणि हे नाव त्यांना सरकार किंवा कला क्षेत्रातील संघटनांनी दिलेलं नसून त्यांच्या चाहत्यांनी त्यांना दिलेली ही उपाधी होती.नसीब के चक्कर, रोटी, पन्ना दाई, दाना पानी, एहसान अशा अनेक चित्रपटांमध्ये बेगम अख्तर यांनी उमटवलेला स्वत:चा असा वेगळा ठसा अजूनही कायम आहे.


गीतकार शकील बदायुनी यांनी लिहिलेल्या आणि बेगम अख्तर यांनी गायलेल्या 'ऐ मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया' या गझलला प्रेक्षकानी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं...
1936 साली 'नसीब का चक्कर' सिनेमासाठी त्यांनी गायलेलं 'कलियुग हे जब से' हे गाणं त्या काळी विशेष गाजलं...
याशिवाय 1942मध्ये आलेल्या 'रोटी' सिनेमासाठी त्यांनी गायलेलं 'उलझ गये नयनवा छुटें नहीं' हे गाणंही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं...बेगम अख्तर यांचं आयुष्य आणि त्यांचं फक्त भारतीय अभिजात संगीत विश्वातलंच नव्हे, तर वैश्विक संगीत विश्वातलं योगदान हे अतुलनीय आहे. त्यासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि संगीत नाटक अकादमी या पुरस्कारांनी गौरवण्यातही आलं. मात्र या कोणत्याही पुरस्कारापेक्षा बेगम अख्तर यांचा दर्जा आणि त्यांचं योगदान वरचढच राहिलं आहे. कायमच!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या