मी योगिनी आहे - ममता कुलकर्णी

  मुंबई  -  

  2000 कोटी रुपयांच्या अमली पदार्थ प्रकरणी शुक्रवारी पहिल्यांदाच अभिनेत्री ममता कुलकर्णी प्रसार माध्यमांसमोर आली. यावेळी व्हिडिओ कॉन्फ्ररन्सिंगद्वारे ममता कुलकर्णीनं आपल्यावरील सर्व आरोप खोडून काढले. हे कलियुग आहे. इथे वाईटाचा उद्धार केला जातो आणि सत्य दाबलं जातं. मी एक योगिनी असून मी सगळ्याचा त्याग केलाय. मला आता कसलीही इच्छा नाहीये. मी सगळं जगले आहे. पैसा-प्रसिद्धी. पण देव मिळवण्यासाठी मी या सगळ्याचा त्याग केला. गेल्या 15 वर्षापासून मी सगळ्या इच्छांचा त्याग केला आहे. जे काही ठाणे पोलिसांनी केलंय त्याचा त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही. माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही. ते पोलीस 2000 कोटींची भाषा करतायत. माझ्याकडे तेवढे नाहीत. फक्त 25 लाख असतील आणि 30 लाखांचे फिक्स डिपॉजीट असेल. मी 10 वर्ष बॉलिवूडमध्ये काम केलं. ज्या प्रॉपर्टीची पोलीस चौकशी करत आहेत ती मी कष्टाने कमवलेली आहे. तुम्हाला ते घ्यायचंय तर घेऊ शकता. माझं आयुष्य हे मी लोकांना आणि देवाला अर्पण केलंय.

   

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.