'द व्हाईस इंडिया किड्स'ची विजेती ठरली मानसी


  • 'द व्हाईस इंडिया किड्स'ची विजेती ठरली मानसी
SHARE

द व्हाईस इंडिया किड्स या & Tv वरील कार्यक्रमाच्या फिनालेमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. स्पर्धकांनी या कार्यक्रमाच्या फायनलमध्ये एकापेक्षा एका परफॉर्मन्स सादर केले. त्यामुळे विजेता कोण ठकणार याबाबत उत्सुकता लागली होती. आणि अखेर पारितोषिक आपलं नावं कोरलं ते उदमारिची मानसी साहारिया हीने. यावर्षीची मानसी ही द व्हाईस इंडिया किड्सची विजेती ठरली आहे.

कानपूरचे शेकिना मुखिया आणि गुंटास कौर, जयपुरचा मोहम्मद फजिल, गुवाहाटीची श्रुती गोस्वामी, उदमारीची मानसी साहारिया आणि अलिपूरदौरची निलांजना रे या सहा स्पर्धकांमध्ये महाअंतिम फेरी रंगली. या सहा स्पर्धकांमध्ये मानसीने विजेतेपट पटकावले. मानसीला २५ लाख रूपये आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं. तर श्रृती आणि निलांजना यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला. त्या दोघींना १० लाख रूपये आणि ट्रॉफी देण्यात आली.


तिसऱ्या वर्षापासून केली गायनाला सुरुवात

मानसी ही आसाममधील एका छोट्याशा गावातून आलेली स्पर्धक होती. मानसीबरोबरच तिच्या आईलाही गायनाची आवड होती. मानसीने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गायनाला सुरूवात केली. मानसीची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे व्हाईस इंडिया किड्समध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत येताना मानसीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मानसीला मुंबईत येण्यासाठी तिच्या गावातील लोकांनी मदत केली. या सगळ्या लोकांचे मानसीने यावेळी आभार मानले.

मानसी म्हणाली, 'मी माझ्या गावातील लोकांचं सगळ्यात आधी आभार मानते. त्यांच्यामुळे मी आज माझे स्वप्न पुर्ण केलं. माझे कोच पलक यांच्या मार्गदर्शनामुळे माझा प्रवास सुखकर झाला. त्यांनी त्यांचा अमूल्यवेळ मला दिला. मला कायमच त्यांनी प्रोत्साहन दिलं. मला आता खात्री पटली आहे की, जर तुमच्यात टॅलेंट असेल तर तुम्ही यश मिळवू शकता. या कार्यक्रमामुळे अनेक चांगेल मित्र मैत्रिणी आणि गुरू भेटले. त्यांच्या सगळ्यांची मी आभारी आहे'.

मानसीचा ऑडिशन्सपासून ते आजपर्यंतचा प्रवास मी बघितला आहे. तीच्यात झालेला बदल मी अनुभवला आहे. तीचा आजपर्यंतचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. तीला विजेते पद मिळाल्याबद्दल मला तिचा खूप अभिमान वाटतोय. तीच्या पुढील प्रवासाठी अनेक शुभेच्छा. या स्पर्धेत सहभागी होणारी ही मुलं खूप टायलेंटेड आहेत.
- पलक, कोच

संबंधित विषय
ताज्या बातम्या