Advertisement

विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज, उपचार सुरू


विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज, उपचार सुरू
SHARES

विनोदवीर विकास समुद्रे याला ब्रेन हॅमरेज झाल्याने २ दिवसांपूर्वी त्याला मीरारोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून विकासला डोकेदुखीचा त्रास होत होता. त्यावर त्याने उपचारही घेतले होते. पण दोन दिवसांपूर्वी त्याची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केलं होतं. विकासवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.


आर्थिक परिस्थिती हलाखिची

विकासची आर्थिक परिस्थिती स्थिर नसल्यामुळे पुढील उपचार कसे करायचे असा प्रश्न त्याच्या कुटुंबियांपुढे उभा आहे. विकासच्या उपचारासाठी विविध संस्था आणि नाट्य सृष्टीतील लोकांनी पुढे येऊन आर्थिक मदत करावी, असं आवाहन त्याच्या कुटुंबियांनी केलं आहे.

विकास समुद्रेने मराठी सिनेमांव्यतिरिक्त मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. झी मराठीवरील विनोदी कार्यक्रम ‘फू बाई फू’ च्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. प्रेक्षकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला.   

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा