• आरोहचं हटके प्रीवेडिंग फोटो शूट
  • आरोहचं हटके प्रीवेडिंग फोटो शूट
  • आरोहचं हटके प्रीवेडिंग फोटो शूट
SHARE

'रेगे' चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता आरोह वेलणकर सोमवारी विवाह बंधनात अडकणार आहे. तो आपल्या कॉलेजमधील मैत्रीण अंकीता शिंगवी हीच्याबरोबर महाबळेश्वरमध्ये लग्न करत आहे.

काही दिवसांपूर्वी आरोहने अंकीतासोबतचा एक फोटो सोशलमीडियावर अपलोड करत आपण लग्न करणार असल्याची खूश खबर चाहत्यांना दिली होती. आरोह-अंकीता हे दोघेही महाबळेश्वरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करत आहेत.


हटके प्री वेडिंग

लग्नाच्या आधी आरोहने आपले प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोशूटसाठी जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो यांसारख्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या सेटचा वापर त्याने केला. हे हटके फोटोशूट त्याने प्रसिद्ध सेट डिझायनर नितीन सरदेसाई यांच्या स्टुडिओतून केले आहे.लग्नासाठी खास अॅप

आरोह हा अभिनेत्यासोबतच इंजिनीअरदेखली आहे. त्यामुळे लग्नासाठी त्याने खास अॅप तयार केलं आहे. आरोह वेड्स अंकीता या अॅपद्वारे लग्नात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं अपडेट निमंत्रीतांना कळणार आहेत. आरोहने आपल्या मोबाईल सूत्र या कंपनीच्या माध्यमातून हे अॅप तयार केलं आहे. या अॅपची सुरुवता त्याने आपल्या लग्नापासून केली आहे. पुढं असं अॅप नंतर कोणीही डाऊनलोड करून त्यांच्या लग्नासाठी वापरू शकतात.

संबंधित विषय
ताज्या बातम्या