ललित-प्रथमेशमध्ये चढाओढ

 Vidhan Bhavan
ललित-प्रथमेशमध्ये चढाओढ

नरिमन पॉईंट - आयएनटी अर्थात इंडियन नॅशनल थिएटर स्पर्धेची प्राथमिक फेरी आता सुरू झाली आहे. यंदाच्या आयएनटीमध्ये काही सेलिब्रिटींचाही प्रत्यक्ष सहभाग असून, त्यांच्या एकांकिकांविषयी खूप उत्सुकता आहे. या स्पर्धेत यंदा अभिनेता ललित प्रभाकर आणि प्रथमेश परब आमने-सामने आले आहेत. अभिनेता ललितने रुईया महाविद्यालयाची, तर प्रथमेशने डहाणूकर महाविद्यालयाची एकांकिका दिग्दर्शित केली आहे.

रुईयाची ‘लैला ऑन द रॉक्स’ तर डहाणूकरची ‘इसमें वो बात नही’ ही एकांकिका स्पर्धेत आहे.

स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये या दोन्ही स्टार्सच्या एकांकिकांची टक्कर होत असल्याने तरुणाईमध्ये त्याविषयी जबरदस्त उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Loading Comments