छोट्या पडद्यावरील अक्षयाची मोठ्या पडद्यावर एंट्री

  Mumbai
  छोट्या पडद्यावरील अक्षयाची मोठ्या पडद्यावर एंट्री
  मुंबई  -  

  मराठी सिनेसृष्टीत हल्ली बरेच नवीन चेहरे पाहायला मिळतायत. मराठी नाटक असो सिनेमा असो किंवा मग मालिका, स्वतःच नशीब आजमवतात. नाटकांमध्ये आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना नंतर सिनेमात काम करण्याचे वेध लागू लागतात. अक्षया हिंदळकर हे त्यातलंच एक नाव. छोट्या पडद्यावरील ‘सरस्वती’ या मालिकेत झळकलेली अक्षया आता मोठ्या पडद्यावर आपल्याला दिसणार आहे. रॉकी या आगामी अ‍ॅक्शनपॅक्ड मराठी सिनेमात अक्षया आपल्याला नायिकेच्या रुपात दिसणार आहे. संजना असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून शांत, सोज्वळ संजनाच्या आयुष्यात घडणाऱ्या अकल्पित घटना नेमकं काय वळण घेणार याची रोमांचकारी कथा म्हणजे रॉकी सिनेमा.

  आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल बोलताना अक्षया सांगते की, दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. प्रत्येकाकडून बरंच काही शिकायला मिळतंय. रोमान्स, फॅमिली ड्रामा व अॅक्शन याचे कॉम्बिनेशन असलेल्या या सिनेमात प्रदीप वेलणकर, अशोक शिंदे, यतीन कार्येकर, गणेश यादव, क्रांती रेडकर, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत, अक्षया हिंदळकर, संदीप साळवे, हिंदीतील अभिनेते राहुल देव हे कलाकार आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.