शाहरुखसोबत झळकणार मराठमोळी ऋचा

एप्रिल महिना आपल्यासाठी खूपच स्पेशल असल्याचं सांगत ऋचा म्हणाली की, ५ एप्रिलला माझा वाढदिवस आहे. यंदाचा वाढदिवस माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. कारण या महिन्यात माझ्या तीन धमाल गोष्टी प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

  • शाहरुखसोबत झळकणार मराठमोळी ऋचा
  • शाहरुखसोबत झळकणार मराठमोळी ऋचा
  • शाहरुखसोबत झळकणार मराठमोळी ऋचा
SHARE

काही कलाकारांना अल्पावधीतच इतकं भरभरून मिळतं की, त्यांच्याकडं सर्वांचंच लक्ष वेधलं जातं. सध्या ‘वेडींगचा शिनेमा’ या मराठी चित्रपटामुळं चर्चेत असलेल्या ऋचा इनामदारचंही असंच काहीसं झालं आहे. लवकरच ती हिंदी सिनेसृष्टीत बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानसोबतच चमकणार आहे.


ट्रीपल धमाका

५ एप्रिल हा ऋचाचा वाढदिवस आहे. या निमित्तानं ऋचानं आपल्या आगामी प्रोजेक्ट्सचं गुपीत उघड करत यंदाचा वाढदिवस आपल्यासाठी ट्रीपल धमाका घेऊन आल्याचं सांगितलं आहे. संगीत दिग्दर्शनाकडून सिने दिग्दर्शनाकडं वळलेल्या गायक-संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये ऋचा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


एप्रिल महिना स्पेशल

एप्रिल महिना आपल्यासाठी खूपच स्पेशल असल्याचं सांगत ऋचा म्हणाली की, ५ एप्रिलला माझा वाढदिवस आहे. यंदाचा वाढदिवस माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. कारण या महिन्यात माझ्या तीन धमाल गोष्टी प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘क्रिमिनल जस्टीस’ या वेबसिरीजमध्ये मी अभिनय केला आहे. ही वेबसिरीस बीबीसी आणि अप्लोस यांनी बनवली असून, तिग्मांशू धुलिया यांनी दिग्दर्शित केली आहे. सिरीयस थ्रिलर, ड्रामा स्पेस आणि उत्तम आशय असलेली या वेबसिरीजचे एपिसोड्स माझ्या वाढदिवसालाच हॉटस्टार स्पेशलमध्ये दाखवायला सुरुवात होणार आहे.

 

वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट

या वेबसिरीजसोबतच ऋचानं शाहरुखसोबतच केलेल्या जाहिरातीही लवकरच प्रदर्शित होणार आहेत. याबाबत ती म्हणाली की, शाहरूख खानबरोबर मी चित्रीकरण केलेल्या मित्सुबिशीच्या दोन जाहिराती याच सुमारास दाखविण्यास सुरुवात होणार आहे. यासोबतच ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटात मी परीची भूमिका साकारली आहे. अशा तीन वेगवेगळ्या माध्यमांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणं, हेच जणू माझ्यासाठी वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट आहे.

 

कौटुंबिक मनोरंजन

ऋचानं यापूर्वी ‘भिकारी’ या चित्रपटात स्वप्नील जोशीच्या नायिकेची भूमिका साकारली आहे. ‘वेडिंगचा शिनेमा’ या कौटुंबिक मनोरंजन देणाऱ्या चित्रपटात ऋचासोबत मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, भाऊ कदम, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या मराठीतील अघाडीच्या कलाकारांबरोबर ऋचाने काम केलं आहे. या सिनेमात ती शिवराज वायचळची नायिका बनली आहे.हेही वाचा - 

‘ललित २०५’ आणि ‘छत्रीवाली’मध्ये उभारली गुढी

बघा, मंगेश-तेजश्रीचा गुढीपाडवा!
संबंधित विषय
ताज्या बातम्या